धातूचे नाणे: Story of Metal Coins, by Design nonstop

धातूचे नाणे: Story of Metal Coins, by Design nonstop

परिस्थितीशी झगडत, मार्ग काढत आणि मेंदूला चालना देत आपल्या डिझाईनच्या गोष्टीतला माणूस आता स्थिरावला आहे. छोट्या छोट्या पाड्यांमध्ये आपल्या कुटुंबाबरोबर राहणारा हा माणूस प्रगतीच्या नवीन वाटा शोधतो आहे. वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक प्रगतीचे टप्पे शोधतांना माणसाला एक नवीन गोष्ट सापडली आहे ती म्हणजे ‘ व्यवहार ‘. स्वतःला जे जमेल ते करून किंवा इतरांशी संवाद साधून आपल्या जगण्यातल्या सगळ्या गरजा पूर्ण करु शकणार नाही याची खात्री आल्यावर माणूस सुरुवातीला वस्तूंची देवाणघेवाण करू लागला. ही देवाणघेवाण वस्तूंच्या बदल्यात वस्तू देणे किंवा एखादी सेवा देणे या स्वरूपाची होती. आपल्या सगळ्यांनाच परिचित असणारा हा व्यवहार म्हणजे वस्तुविनिमय प्रणाली किंवा बार्टर सिस्टीम होय. विकासाच्या वाटेवर धावत असताना वस्तुविनिमया मार्फत व्यवहार करणाऱ्या माणसाला या प्रणालीच्या मर्यादा जाणवू लागल्या. गावं, शहरं, विविध प्रदेश जसे जोडले गेले तसे दैनंदिन व्यवहार अधिक गुंतागुंतीचे होऊ लागले. वस्तुविनिमय करताना एखाद्या वस्तूची किंवा सेवेची गरज, गुणवत्ता, बाजारभाव, उपलब्धता अशा एक ना अनेक गोष्टी भेडसावू लागल्या. या व्यावहारिक अडचणींवर मात करत माणसाने वस्तुविनिमय प्रणाली मोडीत काढली आणि इथे जन्म झाला तो मानवी उत्क्रांतीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या कल्पित संकल्पनेचा (mythical concept) ज्याला आपण ‘ चलन ‘ (currency) म्हणतो आणि या कल्पित संकल्पनेचं डिझाइन केलेलं भौतिक रूप म्हणजे ‘ नाणं ’ (coin).

आपली डिझाईन ची गोष्ट आज घडते आहे मध्यपूर्वेतील ‘टर्की’ नावाच्या देशात. साधारण २५०० वर्षांपूर्वी पश्चिम टर्कीत ‘लिडिया’ नावाचं राज्य होतं. ‘क्रॉसेस’ हा या राज्याचा राजा होता. भौगोलिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आणि उत्तर पश्चिमेकडील एक मोठे व्यापाराचे केंद्र असलेले ‘सर्डीस’ शहर हे लिडिया राज्याचे राजधानीचे ठिकाण. हात लागेल त्याचं सोनं करणाऱ्या ‘मिडास’ नावाच्या राजाची आख्यायिका आपण सगळ्यांनी लहानपणी ऐकली आहे, या अख्यायिकेतला एक असा समज आहे की हा मिडास राजा या सर्डीस शहरात राहत असे. इसवी सन पूर्व ५५० मध्ये क्रॉसेस राजाने सर्डीस शहरात मोठ्या प्रमाणात सोन्याचे उत्खनन केले आणि या मौलिक धातु मधून मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात ‘चलन’ म्हणून सर्वप्रथम वापरली गेलेली सोन्याची नाणी बनवली.

धातूचे नाणे: Story of Metal Coins, by Design nonstop 1
लिडिया येथील‘क्रॉसेस’ सोन्याचे नाणे _इसवी सन पूर्व ५५० – Source: https://artsandculture.google.com/asset/gold-coin-of-croesus/

लिडियन नाणी अस्तित्वात येण्याच्या आधी व्यवहारांमध्ये मौलिक धातूंची देवाण-घेवाण केली जात असे. बहुतेक वेळेला सोन्याची किंवा चांदीची ढेकळे या कारणासाठी वापरली जात असत. पूर्वी व्यवहारात या धातूंच्या आकाराला महत्त्व नसून त्यांचे वजन आणि शुद्धता या दोन कसोट्यांवर व्यवहारातली त्यांची किंमत ठरवली जात असे. परंतु यात एक महत्त्वाची त्रुटी कायम साशंकता निर्माण करणारी होती; ती म्हणजे नैसर्गिक अवस्थेत सोने आणि चांदी यांचे कायम मिसळण असलेले धातूचे साठे सापडतात. कित्येकदा तर यांच्याबरोबर बाजार भावांनी कमी असणारे इतर धातू देखील सापडतात. या साशंकतेनमुळे बऱ्याचदा व्यवहार अडकून पडत किंवा रद्दबातल होत असत. या परिस्थितीवर जालीम उपाय म्हणून लिडियन लोकांनी शुद्ध सोने आणि शुद्ध चांदी वापरून बनवलेली ठराविक वजनांची नाणी बाजारात आणली आणि तिथून पुढे व्यवहाराचा इतिहास पूर्णपणे बदलला. पण लिडियन लोकांना हे समजलं कसं ? या प्रश्नाचं उत्तर देताना इतिहास तज्ञ डॉक्टर पॉल क्रॉडोक सांगतात की, मिश्र धातु मधून तांबे किंवा पितळ बाहेर काढणे तितकसं अवघड नाही, पण खरा प्रश्न उद्भवतो तो म्हणजे सोने उत्खननात निघणाऱ्या चांदीचा. रासायनिक प्रक्रियेत सोने अतिशय कणखर पदार्थ आहे पण चांदी देखील यथार्थ प्रमाणात रासायनिक प्रक्रियेत तग धरू शकते; यावर उपाय म्हणून लिडियन लोकांनी खाणीतून सोन्याची अत्यंत बारीक पावडर गोळा करायला सुरुवात केली त्याचबरोबर धातूच्या मोठ्या ढेकळांना ठोकून बारीक पत्रा काढून तो मीठ आणि सोडियम क्लोराइड यांच्या मिश्रणात साधारण आठशे डिग्री सेल्सिअसला तापवून त्यातून सोने धातु वेगळा केला. अशा पद्धतीने शुद्ध सोन्यापासून बनवलेल्या नाण्यांवर त्याचे वजन आणि त्याची किंमत कळण्यासाठी लोहाराच्या मदतीने मुद्रा घडवायला सुरुवात केली. या नाण्यांना मुद्रांकित करण्यासाठी सिंहाच्या छबीचा वापर केला जाऊ लागला. नाण्याचे वजन आणि त्याची किंमत ही त्यावर मुद्रांकित केलेल्या सिंहाच्या छबी वरून ठरवली जात असे. जसे की, सगळ्यात कमी किंमतीच्या नाण्यावर सिंहाचा फक्त पंजा मुद्रांकित केला जात असे. लिडियन लोकांनी चालू केलेल्या ह्या चलन पद्धतीमुळे व्यवसाय करणाऱ्यांची नाण्याची शुद्धता आणि वजन मोजून बघायची चिंताच मिटली.

धातूचे नाणे: Story of Metal Coins, by Design nonstop 3
लिडिया येथील सोने आणि चांदीची वेगवेगळ्या आकारातील नाणी- Source: https://www.moneymuseum.com/

या बदलामुळे सर्डीस शहरात व्यवहार करणे कोणालाही अतिशय सरळ, सोपं आणि आकर्षक वाटू लागलं. अर्थातच लोकांचा जसा विश्वास वाढला तसं सर्डीसच्या या नाण्यांनी त्याच्या भौगोलिक सीमा ओलांडल्या आणि लिडियन लोकांचे हे नाणे दैनंदिन व्यवहारातले मानक बनून गेले. पुढे काही काळानंतर झालेल्या एका लढाईत पर्शियन सम्राट सायरसने क्रॉसेसचा पराभव आणि क्रॉसेसलाच आपला आर्थिक सल्लागार बनवून राज्यकारभार करू लागला. व्यवहारी क्रोसेसने या संधीचा पुरेपूर फायदा करून घेत लिडियन लोकांनी बनवलेल्या या नाण्यांना भूमध्य आणि आशियाई बाजारपेठांमध्ये महत्त्वाची जागा मिळवून दिली. सर्डीस मध्ये डिझाईन केल्या गेलेल्या या एका छोट्याशा नाण्यानी पुढे आधुनिक व्यवहार आणि राजकारण यांना ऐतिहासिक कलाटणी दिली. प्रांतांपरत्वे नाण्यांच्या आकारात, धातूत आणि मुद्रांकनात बदल होत गेले पण समाजात या काल्पनिक संकल्पनेचं महत्व आजही अढळ आहे यात शंका नाही. डिझाईनच्या ह्या गमती जमती अशाच पुढे चालू राहतील पण आता कधी तुमच्या हाताला नाणं लागेल तेव्हा या गोष्टीची आठवण होईल इतकं नक्की.

Share your comments

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Recent

The 100, Calicut, by Nestcraft Architecture

In this rural escape, The 100, Calicut, by Nestccraft Architecture, ensures a firm marriage between functionality and aesthetics and the planning suggests four bedrooms with attached toilets in a plinth area of 21OO square feet. The home and wabi-sabi landscape within this boundary facilitate meaningful life to 1OO souls.

Read More »
Pune

Pune – An Ever-Evolving Jewel

The essay traces the transformation of Pune from a quaint town to the vibrant city it is today. Mostly it is about the city’s aspects, which make it different and unique. The narrative reminisces about the city’s cultural richness and festive glory. It also points out a bit about the challenges posed by urbanization. But despite everything, Pune successfully retains its cultural essence, making it a city that preserves its glorious heritage while transforming.
This essay by Arpita Khamitkar is amongst the shortlisted essays.

Read More »

Reflection of Urban Inclusivity And Reality

The essay reflects on the author’s childhood memories centred around the Kohinoor Textile Mill. The mill, part of Mumbai’s Girangaon, played a significant role in the city’s industrial growth until the early 1980s. The essay fondly recalls the mill’s impact on the community, its cultural richness, and personal experiences. The author expresses concern about the loss of community identity and the impact of privatization, highlighting the need for sustainable urban development that preserves the city’s history. This essay by Pornima Buddhivant is amongst the shortlisted essays.

Read More »
The case of Phalke Smarak - Nashik

The case of Phalke Smarak

The essay titled, ‘The case of Phalke Smarak : Nashik’s untapped potential with existing urban public space’ – discusses how a promising urban scale public space project for Nashik city in the late 90s has slowly turned desolate, despite all the possibilities and potential the architectural design, site and overall context offers. It further tries to highlight the gap between the public and failed public spaces based on this case, and points towards public engagement for successful urban design, renewal and development. This essay by Asmita Raghuvanshy is amongst the shortlisted essays.

Read More »
The Good, the Bad and the Aesthetic - Bhopal

The Good, the Bad and the Aesthetic

This essay delves into how municipal corporations envision creating Western cities (instead of responding to the Indian context) and end up creating cities that only appear to work, instead of actually being more socially inclusive, dynamic and publicly active. The Smart Cities Mission then caters only to the rich and this becomes evident in not just the visuals they use, but also the manner in which they describe their vision of a World Class Infrastructure. This essay by Avani Mittal is amongst the shortlisted essays.

Read More »

WE ARE HIRING /

ArchitectureLive! is hiring for various roles, starting from senior editors, content writers, research associates, graphic designer and more..

 

PARTICIPATE /