चरखा
आजवरच्या लेखांमधून आपण पाहत आलो माणूस स्वतःच्या गरजांसाठी भौतिक साधनांची जोड-तोड करत, वस्तू बनवत, भोवतालची परिस्थिती स्वतःसाठी सुखकर करत असतो. यालाच तर डिझाईन म्हणतात. तेंव्हा डिझाईनची क्रिया ही माणसाच्या अस्तित्वा इतकीच जुनी आहे. पण हा मनुष्य प्राणी इतका जटील आहे, की त्याच्या गरजा ही तितक्याच क्लिष्ट. आज आपण ज्या वस्तू बद्दल चर्चा करणार आहोत ती माणसाच्या किती गरजा पुरवून गेली ते पहा. त्या वस्तूची निर्मिती मात्र मनुष्याच्या मुलभूत गरजेच्या पूर्ततेसाठी झाली होती. गरज – वस्त्रांची.
माणसानी जंगल सोडलं आणि अन्नासाठी शेतीचा शोध लावला. अन्नाची भ्रांत मिटल्यावर साहाजिकच तो स्थिरावला. पण वस्त्रासाठी अजूनही तो प्राण्यांवर, झाडांवर अवलंबून होता. वाढत्यालोकसंख्येलावस्त्रम्हणूनजनावराचंकातडंकिती काळ पुरणार होतं?वल्कलंसुद्धाफारआरामदायकनाहीतच. यालापर्यायहवाहोता,तेव्हामाणसालानिसर्गातलातंतूउमगला. कोळीष्टकं, घरटीपाहूनविणकामाचंतंत्रमाणसालाअवगतझालंहोतं. सुमारे६००० ते ८०००वर्षांपूर्वीमाणसानीधुर्याचीफिरकी(स्पिंडल) तयारकेली, जिच्या सहाय्यानीसूतकाढलंजाई.
त्याचप्रमाणेझाडाच्याफांद्यांचीचौकटतयारकरून, प्राथमिकमागहीबनवलागेला.सूतकताई आणि विणकामाचं तंत्रज्ञान हळू हळू विकसित होत गेलं. ५००० वर्षांपूर्वीही माणसांनी व्यापार सुरु करून आपली उद्यमशीलता सिद्ध केली होतीच. त्यामुळे आपल्यामुलभूतगरजापूर्णकरून, माणूसव्यापारासाठीअतिरिक्तउत्पादनकरूलागला. त्याकाळीही सिंधुप्रदेशात सर्वातमोठाव्यापारहामसालेआणिसूती कपड्याचा होता. मेंढ्यांच्या तलम लोकरीपासून, उंटांच्या खरड केसांपासून तर कापसाच्या मऊ तंतू पासून धागे तयार केले जात. जाड धागे असतील तर घोंगडी वजा पांघरूण विणलं जाई आणि मऊ धागा असल्यास वस्त्र. त्याच बरोबर धागे आणि कपडा रंगवण्याचं तंत्र ही विकसित होवू लागलं.
भारतात गुप्तसाम्राज्याचा काळ हा सर्वार्थानी सुवर्णकाळ ठरला आहे. या काळात कला, विज्ञान, आणि व्यापार सगळंच उत्तम प्रगतीपथावर होतं. व्यापारात वस्तूंबरोबरच तंत्रांची, कल्पनांची, भाषेचीही देवाण-घेवाण होते. आजपर्यंतचाभारताचाइतिहासघडवणारी, बदलणारीवस्तूयाकाळातजन्मालाआली – तीम्हणजेचरखा. “चरखा” या शब्दाचं मूळ पर्शियन भाषेत असून त्याचा अर्थ चक्र किंवा चाक असा होतो.मुख्य गरज ही मानवी श्रम कमी करून, कापसापासून अखंड, तलम सूत कातण्याचीहोती.एका बाजूला पूर्वी प्रमाणेच फिरकी (स्पिंडल)आहे, जिच्या आधारे सूत काढलं जातं.ही फिरकी पट्ट्याच्या सहाय्यानी मोठ्या चाकाला जोडली आहे. हे चाक फिरवून, आधी काढलेल्या सुताला पीळ दिला जातो, जेणे करून धागा मजबूत होतो. हा धागा मग त्याच फिरकी वर गुंडाळून साठवला जातो.
१५०० वर्षांपूर्वीचा चरखा त्या काळच्या औद्योगिक क्रांतीची गाथा तर सांगतोच; पण त्याही पेक्षा जास्त महत्वाचीभूमिका त्यांनी आपल्या स्वातंत्र्यसंग्रामात बजावली आहे.
दादाभाई नवरोजी, लोकमान्य टिळक, गो. कृ. गोखले, म.गो. रानडे यासारख्यांनी स्वदेशी विचारांची पायाभरणी केली. या विचारांची चळवळ मात्र गांधीजींच्या नेतृत्वाखाली १९०५ साली, बंगालच्या फाळणी प्रसंगी उभी राहिली. विदेशी वस्त्रांची होळी करून ‘इंग्रजी’ वस्तू, विचार आणि सत्तेवर भारतीयांनी सार्वजनिक बहिष्कार नोंदवला. ह्या चळवळीमुळे भारताच्या राजकारण, अर्थकारण, समाजकारण आणि संस्कृती या सगळ्यांमध्ये अमुलाग्र बदल घडणार होता.राजकीय स्वातंत्र्य मिळवण्याची दिशा तर ठरलीच पण त्याही पेक्षा सगळ्या पातळ्यांवरून व्यक्ती स्वातंत्र्याच्या कल्पनांना चालना मिळाली. या चळवळीतून गांधीजींनी आत्मनिर्भर्ता आणि स्वावलम्बनाच्या कल्पना समाजात जागृत केल्या. खादीची वस्त्र, टोपी आणि चपला हा स्वदेशी मतवादी असलेल्यांचा गणवेषच झाला. नवीन विचारांना, तत्त्वांना नवीन रुपकांची, प्रतीकांची गरज असते. ज्यावेळी स्वदेशी चळवळ समाज सुधारणेचं शस्त्र ठरली, त्यावेळी तिची स्वतःची सांस्कृतिक ओळख निर्माण करण्याचीही नितांत गरज होती. आणि लवकरच, “चरखा” हे आत्मनिर्भर्तेचं, आत्मविश्वासाचं आणि स्वाभिमानाचं म्हणजेच स्वदेशी तत्वाचं प्रतिक झालं.
प्रत्येकानी स्वतःच्या कपड्यासाठी सूत स्वतः कातावं यासाठी चरखा प्रत्येक घरात पोहोचला पाहिजे आणि प्रत्येकाला तो वापरता ही आला पाहिजे या हेतूनी १९२९ साली गांधीजींनी भारतातली पहिली डिझाईन ची स्पर्धा जाहीर झाली. ती हा चरखा आधुनिक करण्यासाठी होती. स्पर्धेच्या शर्ती बघा हं – चरखा हलका, कुठेही सोबत नेता येईल असा हवा. कोणालाही डाव्या किंवा उजव्या हातानी किंवा पायानीही सहज वापरता यायला हवा. स्त्रियांनाही त्यावर ८ तास न थकता काम करता यावं. ८ तास काम केलं तर १६००० फुट सुताच्या १२ ते २० लडी तयार व्हाव्यात. चरखा स्वस्त आणि मजबूत असावा – व्यवस्थित काळजी घेतल्यास किमान २० वर्ष टिकावा, आणि अर्थातचत्याचं उत्पादन भारतात व्हावं. ९० वर्षांपूर्वी या स्पर्धेच्या विजेत्याला १ लाख रुपये बक्षीसही जाहीर केलं होतं.
मॉरीस फ्रीडमन या गांधीजींच्या जर्मन मित्रानी आठ स्पिंडल वापरून अतिशय कार्यक्षम असा चरखा बनवला होता. पण तो गांधीजींनी नापसंत केला – कारण तो बघून अतिशय क्लिष्ट भासतो आणि लोकांना आपलासा वाटत नाही. चरखा दिसायला कसा असावा, त्याचा दृष्यानुभव कसा हवा यावरही गांधीजींचा कटाक्ष होता. पारंपारिक चरखा दिसायला, समजायला गुंतागुंतीचा नसून सोपा आहे. शिवाय त्याचं चक्र हे आपल्या मनात खोलवर रुजलेल्या ऐतिहासिक धर्मचक्राची प्रचीती देतं. या जाणीवेतून चरखा भारतीय झेंड्यावर वापरणं औचित्यपूर्णच होतं. १९२१ मध्ये लाला हंसराज आणि गांधीजींच्या सांगण्यावरून पिंगली वेंकैय्या यांनी चरख्याची प्रतिमा असलेला पहिला झेंडा डिझाईन केला.
वस्तू म्हणून पाहायला गेलं तर पारंपारिक चरख्याचं डिझाईन माफक आहे. कमीतकमी साधन वापरून तयार करता येतो आणि वापरायलाही सोपा आहे. अतिशय नम्रपणे हीच वस्तू सत्ता पालट करण्यासाठी शस्त्रही ठरू शकते. आणि मोठ्या तत्त्वज्ञानाचं भावार्थ प्रतिक म्हणून देखील रुजते.